विष्णू साखरे

Friday 16 November 2018

Friday 29 September 2017

दसरा व विजयादशमी सन शुभेच्छा

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्या ची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या आपणास व आपल्या परिवारास  हार्दिक हार्दिक शुभेच्छा!              शुभेच्छुक :- श्री. विष्णू योगीराज साखरे व साखरे परिवार .

Saturday 8 July 2017

🌹🌹आज गुरू पौर्णिमा🌹              
        ज्यांनी मला घडवल.....
या जीवनात मला जगायला शिकवल...
    लढायला शिकवल अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच पाठीशी उभे रहा... माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा, आपण प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो, अशा लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझ्या हृदयाकडुन नमस्कार...!!!

*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*    
            शुभेच्छूक :- श्री. विष्णू योगीराज साखरे

Saturday 6 May 2017

आमची आश्रमशाळा I.S.O. नामांकित झाली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव ता. आंबेगाव जि. पुणे येथील "पहिली I.S.O.  मानांकन प्राप्त आश्रमशाळा"  शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपुर ता. आंबेगाव जि. पुणे या शाळेची यशोगाथा. .........      
1) यशोगाथेतील पहिला मान म्हणजे आंतरराष्ट्रीय युनीसेफ मार्फत जागतीक हॅण्डवाॅश दिवशी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा पुरस्कार  महामहिम राज्यपाल श्री.सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते स्विकारणारी राजपुर आश्रमशाळा. 
2) सलग तीन वर्षे प्रकल्पस्तरीय क्रीडा यशसस्वीपणे आयोजन करणारी राजपुर आश्रमशाळा.
3)महाराष्ट्र शासनाच्या पेसा कार्यक्रम जाहीरातीत झळकलेली राजपुर आश्रमशाळा.
4) आकाशवाणी केंद्र पुणे येथे विद्यार्थी विविध कार्यक्रम व मुख्याध्यापक मुलाखत प्रेक्षेपित होणारी राजपुर आश्रमशाळा. 
5) महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा.श्री. स्वाधीन क्षञीय साहेब यांनी भेट देऊन प्रशंसा केलेली व आठवण म्हणून " आंबा " रोपट्याचे वृक्षारोपण केलेली राजपुर आश्रमशाळा.
6) महाराष्ट्र शासनाच्या "लोकराज्य" मासिकात मा.श्री. स्वाधीन क्षञीय साहेब यांनी दिलेल्या मुलाखतीत दोन पान माहिती प्रसिद्ध झालेली राजपुर आश्रमशाळा.
7) प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक धोरण कार्यक्रमातंर्गत प्रगत शाळा व डिजीटल शाळा म्हणुन पाञ राजपुर आश्रमशाळा.
  8) सन 2016  पासून सुरू झालेल्या "शाळा सिद्धी" मूल्यमापनात "अ" श्रेणी प्राप्त झालेली राजपुर आश्रमशाळा.
9) सुसज्ज शाळा इमारत व वसतिगृह इमारत , शाळा परीसरात तीन बगीचे व सुशोभीकरण केलेला शाळा परीसर असलेली राजपुर आश्रमशाळा.
10) राजपुर आश्रमशाळेचा मानाचा तुरा म्हणजे I.S.O. मानांकन प्रशिक्षण कार्यक्रमा रोजीच "पहिली" नोंदणी करणारी राजपुर आश्रमशाळा.
11) प्रशिक्षण संपलेनंतर प्रथम तपासणी साठी मा.श्री.  अनिल येवले सर (लिड ऑडिटर I.S.O.) त्याच दिवशी भेट देऊन 80% सकारात्मक गुणदान हे शाळेतील सुविधा , सुशोभीकरण व असलेली योग्यता यावर मिळवणारी राजपुर आश्रमशाळा.
12) सुचविलेल्या कल्पनेला परवानगी देणारे मुख्याध्यापक श्री. दोडके सर , रंगाचा ब्रश हातात घेऊन रंग देणारे अधिक्षक श्री.  रायकर सर , फाईल लावणारे ; फ्लेक्स लावणारे ; स्वच्छता करणारे व नवीन कल्पना मांडणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद फक्त राजपुर आश्रमशाळेचेच.
13) सर्व कामाचे मुल्यांकन आणि अहोरात्र कष्ट केलेल्या कामाचे  फळ म्हणजे दिनांक 06/05/2017  वार :- शनिवार. सकाळी सर्व कर्मचारी वृंद शालेय ड्रेस व ओळखपत्रासह सुसज्ज होते. सकाळी 10:00 वाजता मा.श्री.  अनिल येवले सर (लिड ऑडिटर I.S.O.) यांचे आगमन होताच शाळेतील बागेत  फुललेल्या  गुलाबपुष्पाने स्वागत केले व शाळा तपासणी करताना त्यांना आवश्यक व महत्त्वाच्या बाबीवरून शाळा खुप आवडली व  दिनांक 06/05/2017 रोजी त्यांनी प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथील "पहिली I.S.O. मानांकीत आश्रमशाळा म्हणून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपुर ता. आंबेगाव जि. पुणे " या शाळेची  97% गुणाकंन देऊन निवड केली.
15) प्रथम I.S.O. मानांकन मिळवल्या बद्दल शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपुर ता. आंबेगाव जि पुणे या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रकल्प अधिकारी मा.श्री.  सोनकवडे साहेब , सहा. प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मा.श्री.  देसाई साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. अबुज सर , मा.श्री. भवारी सर  व प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा यांनी विशेष अभिनंदन व कौतुक केले. 
                                      "  श्रम , सात्यत व सत्य हेच यशाचे मुख्य सुञ ".                   
                                                             
                                                                 आपले नम्र                    
                                           मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी वृंद                                         
                         पहिली I.S.O. नामांकित (प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत)  
                       शासकीय माध्यमिक आश्रमशाळा राजपुर ता. आंबेगाव जि. पुणे.

Featured post

Our School

https://www.youtube.com/channel/UC1vGae2Q3oT5MkhhfW8lwjg